ताज्या बातम्या

सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणूक रिंगण स्पष्ट; उरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

सातारा(प्रताप भणगे) : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारीनंतर रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी उरलेल्या उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद गट क्रमांक 54 ते 65 तसेच पंचायत समिती गण क्रमांक 107 ते 130 मधील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), काँग्रेस, मनसे, बसपा तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात असून विविध गटांत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, वारुंजी, तांबवे, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले व येळगाव या गटांमध्ये प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही ताकद लावली आहे.
त्याचप्रमाणे कराड पंचायत समिती अंतर्गत पाल, चरेगाव, उंब्रज, तळबीड, वडोली भिकेश्वर, मसूर, वाघेरी, कोपर्डे हवेली, हजारमाची, सैदापूर, वारुंजी, कोयना वसाहत, सुपने, तांबवे, कोळे, विंग, गोळेश्वर, कार्वे, शेरे, रेठरे बुद्रुक, काले, कालवडे, सवादे व येळगाव या गणांमध्ये उमेदवारांना कमळ, धनुष्यबाण, तुतारी वाजवणारा माणूस, हाताचा पंजा, घड्याळ तसेच विविध अपक्ष चिन्हांचे वाटप झाले आहे.
निवडणूक चिन्हे निश्चित झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून मतदारसंघनिहाय प्रचार सभांमधून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात उमेदवारांची प्रचार रणनिती व मतदारांचा कौल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top