ताज्या बातम्या
नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सदिच्छा सामाजिक विकास संस्थेचा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न

गोकुळ कॉम्प्लेक्स मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पनवेल (अमोल पाटील)- आजीवली तालुका पनवेल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावर्षी ध्वजारोहणासाठी सन्माननीय अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कॉम्प्लेक्स मध्ये ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणेने परिसर दुमदुमला. ध्वजारोहणानंतर मुला मुलींचे प्रजासत्ताक दिनाविषयी वकृत्व केले. त्यानंतर मुलांना व नागरिकांना खाऊ वाटप केले. कार्यक्रमासाठी महिलांनी विशेष भारताच्या रेखाटून त्यामध्ये तीन कलरची रांगोळी भरून आकर्षक नकाशा तयार केला त्यामुळे कार्यक्रमाला बहारदार स्वरूप आले. नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाला गोकुळ कॉम्प्लेक्स मधील नागरिक,विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top