ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कोपरखैरणेत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली व प्रबोधन कार्यक्रम

वी मुंबई : कोपरखैरणे येथे रस्ता सुरक्षा अभियान व रेजिंग डेच्या अनुषंगाने वाहतूक शाखा, कोपरखैरणे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती रॅली व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच वाहनचालक व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची माहिती व त्याचे पालन करण्याबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमांतर्गत बालाजी सिनेमा ते शाळा क्रमांक १७ व डी-मार्ट चौक या मार्गावर सुमारे २५० विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा, हेल्मेट व सीटबेल्ट वापर, सिग्नलचे पालन आदी विषयांवर प्रबोधन करण्यात आले.

या कार्यक्रमाला एपीआय वाघ, पीएसआय देशमुख, पीसी व सहा पोलीस अंमलदारांनी मार्गदर्शन केले. रॅलीमुळे वाहनचालक व नागरिकांमध्येही वाहतूक नियमांबाबत सकारात्मक संदेश पोहोचला.

सदर कार्यक्रम दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १३.०० या वेळेत डी-मार्ट चौक ते बालाजी सिनेमा, कोपरखैरणे या परिसरात पार पडला. या उपक्रमात सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच वाहनचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top