कराड(प्रताप भणगे) : कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कराड नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना विविध नागरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना नगराध्यक्ष यादव यांनी उद्या एसपी साहेब कराडमध्ये येणार असून हे निवेदन त्यांच्याकडे सादर करून संबंधित विषयांवर निश्चित तोडगा काढण्याची ग्वाही दिली.
यावेळी कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यामध्ये अध्यक्ष: सौ. वैशाली संजय जाधव (कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटी), सरचिटणीस: सौ. अर्चना पाटील (कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस कमिटी, खोडशी), सरचिटणीस: सौ. मनीषा शिंदे (कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस कमिटी),सदस्या: सौ. उषा माने (कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस कमिटी)
सदस्या: सौ. सुविद्या कदम (कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस कमिटी) नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.




