ताज्या बातम्या

साताऱ्यामध्ये सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी विश्वव्यापी संत संमेलन महासन्मान सोहळा….

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील पवित्र भूमित भारत देशातील महान तपस्वी साधुसंतांचे आगमन होत आहे. यानिमित्त सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजता वाजेपर्यंत विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक श्री घनश्याम देवीबाई नारायणदास छाबडा यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
विश्वशांती विश्व कल्याण आरोग्य मार्गदर्शन पर्यावरण शुद्धी, वृक्षारोपण, अन्नसुरक्षा, जलसुरक्षा, कन्या बचाव, देव- देश- धर्म अध्यापिक प्रचार व प्रसार या हेतूने सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट रायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा येथील सौ देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये हे विश्व व्यापी संत संमेलन जोरदार तयारी सुरू झालेली आहे. राष्ट्रीय महामार्गापासून आनेवाडी नजीक तीन किलोमीटर अंतरावर छाबडा शिक्षण संस्थेच्या आवारात सध्या भाविकांची गर्दी होत आहे.
या विश्वाचे संत संमेलन सन्मान सोहळ्यासाठी जगद्गुरु शंकराचार्य, स्वामी कृष्णानंद गिरी महाराज, कुंभमेळा समिती परमपूज्य महंत श्री राम नारायण दानजी यांच्यासह अनेक मान्यवर साधु संत महंत उपस्थित राहणार आहेत. सध्या संपूर्ण देशांमध्ये बंधुभाव व समता निर्माण करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथमच रायगाव भूमीमध्ये विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन आर्शिवर्जन महासन्मान सोहळा होत आहे. या वेळेला महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले असून जगभरातील अध्यात्मिक गुरु व शिष्य तसेच धार्मिक कार्यासाठी उत्तर भारतातील काशी ते पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण काशी पर्यंत अनेक जण भेट देत आहेत. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील निसर्गरम्य रायगावच्या भूमीतच भारत देशातील अनेक अध्यात्मिक गुरु यांचे दर्शन होणार आहे. त्यामुळे भाविक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या विश्वव्यापी संत, महंत, धर्माचार्य ,धर्मगुरू यांच्या स्वागतासाठी जागोजागी भाविकांच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेला सन्माननीय श्री घनश्याम छाबडा व मान्यवर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top