मुंबई(रमेश औताडे) : सरकारने शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी अनेक घोषणा केल्या. मात्र सरकारी अधिकारी त्याची अंमलबजावणी करताना कागदी घोडे नाचवत व अटी शर्ती व नियम दाखवत शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे.
भुमी-अभिलेख कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी होणार नाही यासाठी सरकारी अधिकारी योग्य ती दक्षता घेत शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत. याबाबत माहिती देताना शेतकरी म्हणाले, तालुका खेड.जि.पुणे येथील दावडी गावातील गट क्रमांक ३२४ / १/ क , ३२४ / ५ ची मोजणी व हद्द कायम करण्याची नोटीस १२ डिसेंबर २०२५ रोजी खेड भुमी-अभिलेख विभागाचे उपअधिक्षक डॉ. नितीन सूर्यवंशी यांनी नोटीस काढली. मोजणी १९ डिसेंबर २०२५ रोजी ठेवली होती.
परंतु भुकर मापकाने १७ डिसेंबर २०२५ रोजी पोस्टात नोटीसा दिल्याने प्रतिवादींना नोटीसा मिळाल्या नाहीत. त्या मुद्द्यावर घटनास्थळी जाऊन भुकर मापक नामदेव कोल्हे यांनी मोजणी रद्द केली. याबाबत नोटीसा मिळणार नाही व मोजणी होणार नाही याचीच दक्षता घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी जमाबंदी आयुक्त डाॅ सुहास दिवसे संचालक भुमी-अभिलेख यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
दोन वर्षात अंमलबजावणी झाली नाही. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मंडलाधिकारी यांनी ताब्याची कार्यवाही ठेवली असताना डाॅ.नितीन सूर्यवंशी यांनी तहसीलदार खेड यांना पत्र पाठवून तफावतदर्शक नकाशा असल्याने निकाली काढल्याचे नमुद केले होते. चांगुणाबाई गव्हाणे यांचा मुलगा व राणी गव्हाणे यांचे पती शिवाजी गव्हाणे यांचे निधन झाले आहे. महिलांवरील अन्यायाबाबत दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल
असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.



