ताज्या बातम्या

पंचरत्न मित्र मंडळ व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्यावतीने वाशी गाव चेंबूर येथील स्थानिक नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर) :पंचरत्न मित्र मंडळ व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी गाव चेंबूर येथील स्थानिक नागरिकांकरता वैद्यकीय शिबिराचे नुकतेच वाशी ग्राम सभागृह मंडळात करण्यात आले होते.१७५ ते २०० नागरिकांनी वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमात रक्तदाब, शुगर तपासणी,पी एफ टी टेस्ट इत्यादी तपासणी करून मोफत औषधे व चष्मा वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुण्या नजहत शेख मॅडम संचालक वित्त आरसीएफ विशेष पाहुणे श्री.धनंजय खामकर साहेब (ॲडव्हायझर सी.एस.आर आरसीएफ ली.),श्री.माणिक पाटील साहेब (अध्यक्ष- वाशी ग्रामसेवा मंडळ),श्री.धनंजय ठाकूर(सचिव वाशी ग्रामसेवा मंडळ), संतोष शिकतोडे साहेब (उपअभियंता नवी मुंबई महानगरपालिका),श्री जयेंद्र खुणे(अध्यक्ष – मुंबई प्रदेश आगरी सेना) सदर कार्यक्रमात नानावटी हॉस्पिटलची टीम तसेच डॉक्टर विनीत गायकवाड, डॉक्टर रजनीशकुमार हे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्या नजहत शेख मॅडम(संचालक वित्त आरसीएफ)यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले की, पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्ष समाजपयोगी उपक्रम राबवित असून त्या उपक्रमला आर.सी. एफ.चा सी. एस.आर विभाग सातत्याने सहकार्य करत आहे. तळागाळातील लोकांना, गोर-गरीब विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, वृद्धाश्रम आदी आवश्यकता असलेल्या ठिकाणी पंचरत्न मित्र मंडळ चे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक जाऊन मदतीचा हात देत आहेत. अगदी कोरोना काळातही या मंडळाने अनेक ठिकाणी मदत करत अन्न धान्य किट वाटप केले. पूर, दुर्घटना ज्या ज्या ठिकाणी झाल्या त्या त्या ठिकाणी या मंडळाने मदत केली आहे. मंडळ चे काम कौतुकास्पद आहे. त्यांना त्याच्या पुढील उपक्रमला मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.
समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर,सचिव प्रदीप गावंड, उपाध्यक्ष रमेश पाटील,खजिनदार सचिन साळुंखे,हनुमंता चव्हाण,सौ.नीलम गावंड,प्रकाश शेजवळ,डी एम मिश्रा वैभव घरत, संदीप पाटील,सतीश कुंभार,पुरुपाटसावगीकर, शितल पाटील,नीता पाटील, रमाकांत गावंड,मॅथ्यू डिसूजा या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नानीवडेकर मॅडम यांनी केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top