ताज्या बातम्या

रोटरी क्लब मलकापूरच्या सदस्यांचा नगराध्यक्षपदी बहुमताने विजय

कराड(विजया माने) : मलकापूर नगर परिषदेमध्ये झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत रोटरी क्लब मलकापूरचे सदस्य श्री. तेजस सोनावले यांनी बहुमताने विजय मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल रोटरी क्लब मलकापूरच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सदस्यांनी श्री. तेजस सोनवले यांना नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
रोटरी क्लब मलकापूरचे अध्यक्ष श्री. राहुल जामदार यांनी आपल्या मनोगतात क्लबचा एक सदस्य नगराध्यक्ष झाल्याचा अभिमान व्यक्त केला. तसेच येणाऱ्या काळात रोटरी क्लब व नगर परिषद यांच्या माध्यमातून समाजसेवेची विविध कामे एकत्रितपणे अधिक प्रभावीपणे राबवूया, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष श्री. तेजस सोनवले यांनी आभार प्रदर्शन करताना समाजहिताची, विकासाभिमुख व जनतेच्या हिताची कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले आणि रोटरी क्लब मलकापूरच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top