ताज्या बातम्या

मृदगंध चरित्र ग्रंथ : कृषिभूषण श्री. जयवंतभाई चौधरी यांच्या जीवनपटाचे उद्बोधक दर्शन

मुंबई : कृषिभूषण श्री. जयवंतभाई चौधरी यांचा जीवनपट उलगडणाऱ्या मृदगंध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विसावा रिसोर्ट-केळवे, पालघर येथे नुकताच उत्साहात, संपन्न झाला. यावेळी मृदगंध पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक विनय राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षात्रैक्य परिषदेचे विश्वस्त श्री. विजय पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष डॉ. नरेश सावे हे उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास डॉ. किरण सावे (प्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय), विशेष अतिथी श्रीमती मनिषा कोटक(मुख्य विश्वस्त आनंद वृद्धाश्रम), पर्यटन सम्राट श्री. जगदीश ठाकूर, श्री. अनिल सावे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषिभूषण श्री. जयवंतभाई व त्यांच्या पत्नी सौ. जयंती यांचा सत्कार करण्यात आला. मृदगंध या पुस्तकाचे संपादक विनय राऊत, संजीव चुरी, डॉ. सुचिता पाटील, श्री सच्चिदानंद महाडिक (संपादक तरूण पालघर), कामगार व सेवक वर्ग तसेच लेखकांचा सत्कार करण्यात आला. कवि रमाकांत पाटील यांनी भाईंना स्वलिखीत सन्मानमत्र भेट दिले. भाईंनी अनेक सस्थांवर पदे भूषविली आहेत.

मृद्‌गंध हा जीवनपट सुंदर, सुबक व वाचनीय आहे. भाईंनी १०० वर्ष गाठावीत तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे असे मत मान्यवरांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

कृषिभूषण भाईंना महाराष्ट्र सरकार कडून मिळालेले आहे. सर्वद फाउंडेशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुचिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संजीव चुरी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top