ताज्या बातम्या

शिवसेना(उबाठा) चे माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

शिवसेना(उबाठा) गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ठाण्याच्या उबाठा गटातील पदाधिका-यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, ठाणे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. चव्हाण यावेळी म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारे, येथील समस्यांची जाण असणा-या सुभाष भोईर यांनी उबाठा गटाच्या पदाधिका-यांसोबत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. युतीमध्ये काम करणारे भोईर यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असून त्यांच्या भाजपा प्रवेशाने संघटना मजबूत होणार आहे.

श्री. भोईर म्हणाले की, विकासपुरूष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास गतीने होत आहे. प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण तळागाळात जाऊन सेवा करत आहेत याने प्रेरित होऊन समाजाची सेवा करण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपापासूनच आपली राजकीय कारकीर्द सुरु झाली त्यामुळे भाजपा नवीन नाही.

आ. केळकर म्हणाले, आमच्या जुन्या सहका-याचा प्रवेश झाला आहे ही आनंदाची बाब आहे. भाजपाची पंचतत्वे, विचारधारा त्यांना माहिती आहे. तगडा जनसंपर्क असलेले हे व्यक्तिमत्व भाजपामध्ये आल्याने भाजपा संघटनेला बळकटी मिळाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांत भाजपाची ताकद वाढेल.

कल्याण ग्रामीणमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुभाष भोईर यांचे पुत्र सुमित भोईर, उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, उप तालुकाप्रमुख सुखदेव पाटील, कल्याण विधानसभेचे युवा अधिकारी सूरज जाधव, दिवा शहर युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर, शिळ उप युवा शहर अधिकारी प्रसाद पाटील, शीळ विभागप्रमुख विश्वनाथ पाटील, युवासेना शहर सचिव दिवा उमेश राठोड, उप शहर अधिकारी सुयोग राणे, दिवा विभाग अधिकारी आकाश शुक्ला, अक्षय भोईर आदींचा समावेश आहे.

भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या ठाण्याच्या उबाठा गटाच्या पदाधिका-यांमध्ये राज वर्मा, बाळा शिंदे, प्रफुल्ल साळवी, उप शाखाप्रमुख प्रशांत पेडणेकर, शुभम कदम, युवासेना शाखा अधिकारी मनोज जाधव, विपुल साळवी, साहिल वर्मा, कुणाल भुरटे, निखील पवार, निखील जाधव, प्रणय भोईर आदींचा समावेश आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top