पुणे :

कारेगाव ता. शिरूर येथील हनुमान वि. का. से. सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या चेअरमन प्रियांका प्रकाश कोहोकडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीसाठी दत्तात्रय हरिभाऊ शेवाळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ए एस धायगुडे यांनी दत्तात्रय शेवाळे यांच्या निवडीची घोषणा केली. श्री शेवाळे यांचे वडील श्री हरिभाऊ दौलतराव शेवाळे यांनीही यापूर्वी सोसायटीचे चेअरमनपद भूषविले आहे.
ह्या निवडीनंतर पंचायत समितीचे सभापती विश्वासराव कोहोकडे व जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे यांच्या हस्ते नूतन चेअरमन दत्तात्रय शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. ‘मी संस्थेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध आहे.’ असे मत नूतन चेअरमन शेवाळे यांनी यावेळी मांडले.
यावेळी कारेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुनील ओस्तवाल, ग्रामपंचायत सदस्य दीपक कोहोकडे, भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष तुळशीदास दुंडे, उद्योजक प्रमोद कोहोकडे, राज्य युवा धोरण समितीचे सदस्य ॲड. संग्राम शेवाळे यासह सोसायटीचे संचालक, सचिव उपस्थित होते.




