ताज्या बातम्या

श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ (मूर पंच क्रोशी)यांच्या वतीने शैक्षणिक सहाय्यता निधीसाठी दादर येथे विशेष कार्यक्रम

मुंबई (शांताराम गुडेकर) : राजापूर तालुक्यातील पाचल शेजारील मूर गावातील श्री.काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ (मूर पंच क्रोशी)यांच्या वतीने शैक्षणिक सहाय्यता निधीसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.रविवार – २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर पश्चिम येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे दोन अंकी तुफान विनोदी नाटक —
“हीच खरी फॅमिलीची गंम्मत आहे” चे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक साहित्य निधीसाठी आहे.नाटकाच्या तिकिटातून मिळणारा संपूर्ण निधी श्री.काळेश्वर विद्यालय या शाळेसाठी जमा होणार आहे.तरी कोकणातील सर्व
मित्रपरिवार,कोकणकर कलाप्रेमी,मूर पंच क्रोशी व परिसरातील सर्व ग्रामस्थ,आजी/माजी विद्यार्थी बांधव, राजापूर पूर्व विभागातील सर्व कोकणवासीयांना मन:पूर्वक आवाहन आहे की,या सामाजिक कार्यात सहभागी व्हा आणि नाटकाची तिकिटे खरेदी करून शैक्षणिक निधीस हातभार लावा. तिकिट दर: ₹500/ ₹400/ ₹300 असा आहे.नाटकाचा आनंदही मिळेल आणि एका सामाजिक कार्याला थेट मदतही होईल हा कार्यक्रम यासाठीच ठेवला आहे.
त्याच दिवशी या शाळेचे सन्मा.श्री.एस.बी. कुलकर्णी सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा देखील होणार आहे.चला तर मग एकत्र येऊ आणि हा आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम भव्य यशस्वी करूया..! तिकीट व अन्य अधिक माहिती संदर्भात श्री.रविंद्र नारकर मो.9892986033/श्री.रुपेश कोलते मो. 8928225996या नंबरवर संपर्क करावा.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top