ताज्या बातम्या

सिडको घरांच्या किमतीत १० टक्के कपात केल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा सिडको विजेत्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचा आज सिडको घर विजेत्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सिडको तर्फे देण्यात येणाऱ्या घरांच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्य व मर्यादित उत्पन्न असलेल्या विजेत्यांना परवडणाऱ्या नसल्याने, या प्रश्नासाठी आमदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

सिडको घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी आमदार शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून दोन वेळा हा प्रश्न उपस्थित केला. यासोबतच मोर्चे व आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या ठोस प्रयत्नांमुळे अखेर सरकारला सिडको घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे हजारो सिडको विजेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेकांचे घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कळंबोली नोड, खांदेश्वर नोड, मानसरोवर नोड येथील सिडको विजेते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एकत्र जमले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कळंबोली रोडचे श्री. वैभव पवार, श्री. लहू काढणे, गोरख पवार, गणेश गोफणे,अमोल ढिकले,श्रीकांत कोळेकर, नितीन तिकोनयांच्यासह अनेक सिडको विजेते उपस्थित होते.

सिडको घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे सामान्य नागरिकांसमोर निर्माण झालेली अडचण आमदार शिंदे यांनी प्रभावीपणे सरकारसमोर मांडली. सामान्य लोकांचा नेता म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आणि घराच्या स्वप्नासाठी दिलेला लढा सिडको विजेत्यांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top