ताज्या बातम्या

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; सचिवपदी एच बी जंगम यांची निवड

मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले अनेक नामवंत कलाकार, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला प्रतिष्ठानच्या गेल्या वर्षभरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर भविष्यातील उपक्रमांबाबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्याच्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यात संगीत विद्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने काही दानशूर व्यक्तींनी आपली काही गुंठे जागा बक्षीस स्वरूपात दिल्याबद्दल त्या मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.या सभेत महत्त्वाचा निर्णय घेत प्रतिष्ठान स्थापनेपासून कार्यरत असलेले सचिव जगदीश मरगजे यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ सदस्य श्री. हरिशश्चंद्र(एच.बी) जंगम यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, नवनिर्वाचित सचिव एच. पी. जंगम, खजिनदार सुरेश धर्मा पाटील, ॲड. प्रल्हाद भिलारे, दिग्दर्शक संदीप जाधव, विनोद शिंदे, संभाजीनगरचे मोरे साहेब, ॲड.साईश जाधव, शालिनीताई म्हात्रे, संगीता गीते, मळवी मॅडम, आशिष शिंदे, व्यवस्थापक म्हणून निवड झालेले निवृत्ती पाटील, महेश निवळे, अशोक कदम, प्रकाश उतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सभेच्या शेवटी आशिष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top