
कराड(प्रताप भणगे) : मसूर येथील विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित, मसूर या संस्थेच्या सन २०२६ सालच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मा. मानसिंगराव जगदाळे साहेब यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मसूरचे लोकनियुक्त सरपंच तसेच विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे संचालक पंकज दीक्षित, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर शिरतोडे, माजी सरपंच प्रकाश माळी, माजी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, चंद्रकांत घोलप, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नरेश माने, विजयराव जगदाळे (नाना), विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन सचिन चव्हाण, आत्माराम घोलप, शरद चव्हाण, महेश घाटगे, मारुती जाधव (कटर), मधुकर दीक्षित, बापूसाहेब कांबिरे, सिकंदर शेख, जमीर मुल्ला, विक्रम जगदाळे, वसंत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दैनिक ऐक्यचे ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण गुरव, संदीप पारवे, उमेश पाटील, विकास पाटोळे, वसंत पाटोळे, सचिन दीक्षित, सचिन जगदाळे, भरत कांबळे तसेच पतसंस्थेचे सचिव कुंभार साहेब, सर्व संचालक, महिला संचालक, पदाधिकारी, संस्थेचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनदर्शिकेच्या माध्यमातून संस्थेच्या सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा मांडण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




