ताज्या बातम्या
मराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावरअक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचा साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा

बुध येथील शंभूराज राजेघाटगे यांची एअर फोर्स मध्ये निवड….

पुसेगाव(अजित जगताप) : खटाव तालुक्यातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध विद्यालयाचे माजी विद्यार्थी शंभूराज राजेघाटगे यांची इंडियन एअरफोर्समध्ये स्पर्धा परीक्षा मधून निवड झाली .त्याबद्दल विद्यालायाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी शंभूराज राजेघाटगे यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये भरती होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी व त्यानंतर द्याव्या लागणाऱ्या चाचण्या या संदर्भात माहिती सांगितली .जिद्ध व सातत्याने केलेले प्रयत्न , विद्यालयातील गुरुजणांचा आशिर्वाद व आई-वडील व बंधु अर्थव राजेघाटगे यांनी दिलेली प्रेरणा यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले आहे. असे आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले .
यावेळी शंभूराजचे वडील पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांचा पर्यवक्षेक नाना दडस यांच्या हस्ते गुलाबपुष्प बुके देऊ सत्कार करण्यात आला . प्रकाश राजेघाटगे यांची दोन्ही मुले अर्थव व शंभूराज नेव्ही व एअरफोर्स मध्ये नोकरी मिळवून आईवडीलांचे स्वप्न साकार केले आहे. हे विद्यालयासाठी ही अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. असे भगवान सरवदे यांनी सांगितले . दोंघानिही कमी वयात यश मिळवले ही विद्यालयाच्याच्या विद्यार्थ्यासाठी प्रेरणा आहे .
यावेळी प्रकाश राजेघाटगे यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा वाढदिवस साजरा केला . विद्यालयातील प्राचार्य , प्राध्यापक शिक्षक -शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी तसेच बुध व बुध पंचक्रोशीतीलतील ग्रामस्थाच्या वतीने शंभूराज चे अभिनंदन करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान सरवदे यांनी केले ,तर आभार तानाजी पाटील यांनी मानले.

—— —— —— —– —— —— —– —-
फोटो– एअर फोर्स मध्ये निवड झाल्याबद्दल श्री राजेघाडगे यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया– निनाद जगताप , पुसेगाव)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top