ताज्या बातम्या

भूषण गवई राज्यकर्त्यांचे पाप झाकून दलितांमध्ये संघर्ष माजवत आहेत ! दलित नेते, विचारवंतांचा आरोप

मुंबई : राज्यकर्त्यांनी पुणे कराराचा केलेला भंग आणि अनुसूचित जातींचा केलेला घोर विश्वासघात हेच आरक्षणाच्या लाभाबाबत असमानता निर्माण होण्याचे खरे मूळ कारण आहे. पण ते दडवून ठेवून माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे अनुसूचित जातींमध्ये स्पर्धा, चढाओढ सुरू असल्याचे सांगत गैरसमज, आकस आणि आपसातील संघर्षाची चूड पेटवत आहेत, असा स्पष्ट आरोप दलित नेते आणि विचारवंतांनी केला आहे.

या संदर्भातील एक पत्रक शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष, माजी आमदार बाबुराव माने, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, बुद्धिस्ट – शेड्युल्ड कास्टस मिशनचे संयोजक अच्युत भोईटे यांनी आज प्रसिध्द केले आहे.

गवई हे सरकारच्या चुका आणि पापांवर पांघरूण घालण्यासाठी आरक्षणाचा लाभ मिळालेल्या काही जातींना आपलपोट्टे ठरवत आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांच्या विरोधात लाभापासून वंचित राहिलेल्या जातींना उकसवत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

*पुणे कराराचा भंग;*
*दलितांचा विश्वासघात*

पुणे करारात आरक्षणाच्या लाभासाठी अनुसूचित जातींना सक्षम करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्यांच्या सरकारवर सोपवणारे कलम महत्वाचे होते. त्यात दलितांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण राज्यकर्त्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. हा पुणे कराराचा भंग आणि दलितांचा विश्वासघात आहे, असे दलित नेत्यांचे म्हणणे आहे.

आरक्षणातून शिरकावासाठी फक्त संधी उपलब्ध होते. त्या संधीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता अपरिहार्य असते . पण शिक्षण मिळवणे कठीण, अशक्य झालेल्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या अनुसूचित
जातींना समान संधीचा लाभ मिळणार तरी कसा ? असा सवालही पत्रकातून त्यांनी विचारला आहे.

अनुसूचित जातींवर घटनाबाह्य क्रीमी लेअर लादण्यासाठी आणि त्यांचे उपवर्गीकरण
रुजवण्यासाठीची गवई यांची सारी वक्तव्ये, भाषणे ही प्रचारी थाटाची आहेत. तसेच त्यांचा आविर्भाव – आवेश हा ‘ कंत्राट ‘ घेतल्यासारखा आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

*आधी शिक्षणाच्या खासगीकरणावर बोला !*

‘ समान संधीसाठी सकारात्मक धोरण कृती ‘ साठी कार्यरत झालेल्या भूषण गवई यांनी एकूणच बहुजन समाजाला शिक्षण मुश्कील करून ‘ समान संधी ‘ च्या तत्त्वाला हरताळ फासणाऱ्या शिक्षणाच्या खासगीकरणा वर आपली भूमिका आधी स्पष्ट करावी, असे आव्हान पत्रकाच्या शेवटी देण्यात आले आहे.
==============
आपले विनीत,

∆ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर
शिक्षणतज्ज्ञ
मो : 9930958025

∆ माजी आमदार बाबुराव माने
अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघ
मो : 9987676767

∆ प्रबुद्ध साठे
अध्यक्ष, प्रजासत्ताक जनता परिषद
मो : 7774818204

∆ दिवाकर शेजवळ
अध्यक्ष, आंबेडकरवादी भारत मिशन
मो : 9022609692

∆ अच्युत भोईटे
संयोजक, दि बुद्धिस्ट – शेड्युल्ड कास्टस मिशन ऑफ इंडिया.
मो: 9870580728

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top