मुंबई(रमेश औताडे) : राज्य सरकार आणि पोलिस विभागाकडून होत असलेल्या निष्क्रीयते विरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलन नागपूरला असले तरी त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचे ठरवले आहे. सरकारने जर अधिवेशनात मला योग्य तो न्याय दिला नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या व्यक्ती सोबत भांडण सोडवत असताना त्यांनाही मारहाण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात २४ दिवस अतिदक्षता विभागात दाखल केले होते. मुख्यमंत्री, गृह मंत्रालय, ठाणे पोलिस आयुक्त, तसेच राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दिल्या आहेत. यावेळी भिषप शांतकुमार शेळके, ओलविर डिसुझा, निशा साळवे उपस्थित होते.




