ताज्या बातम्या

नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या आज शेवटच्या दिवशी प्रचाराचा तोफा धडाडणार!!!

नवी मुंबई(अमोल पाटील) : महाराष्ट्रात नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रचाराची समाप्ती १ डिसेंबर रोजी १०.०० वाजता होणार आहे. मात्र मतदान २ डिसेंबर रोजी होणार असल्याने मुद्रित माध्यमातही जाहिरात प्रसिद्ध करू नये असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी निवडणुकांच्या प्रयोजनात प्रसारमाध्यम सनियंत्रण व जाहिरात प्रमाणे आदेश २०२५ प्रसिद्ध केला आहे या आदेशाच्या भाग आठ मधील परिच्छेद १६ नवे नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी प्रचार समाप्तीनंतर मतदान दिवशी म्हणजे २ डिसेंबर रोजी मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमे कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसाद करता येणार नाहीत असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top