ताज्या बातम्या

डाकेवाडी येथे गुरुचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पारायणाचे यंदा 33 वे वर्ष आहे. वै.ह.भ.प.यशवंत महाराज डाकेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.नामदेव महाराज डाकेवाडीकर हे व्यासपीठचालक चालक आहेत. विनापूजन यशवंत मारुती डाकवे, उद्घाटन हरी बळी डाकवे, तुकाराम गोविंद डाकवे, मुर्तीप्रतिष्ठापना अशोक रामचंद्र डाकवे, ग्रंथपूजन बाळू बाबू डाकवे यांच्या हस्ते होणार आहे.

रविवार दि.30 नोव्हेंबर, 2025 रोजी ह.भ.प.जयश्रीताई महाराज धाईटी, सोमवार दि. 1 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज मत्रे, मंगळवार दि. 2 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर, बुधवार दि.3 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.धनश्रीताई महाराज बोर्गे, गुरुवार दि. 4 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.अचर्नाताई महाराज सुर्यवंषी यांची कीर्तने होणार आहेत.
तर शुक्रवार दि.5 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता ह.भ.प.धोंडीराम महाराज सवादेकर यांचे काल्याचे किर्तन तसेच गुरुवार दि.4 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ तर सायंकाळी 6.00 वाजता श्री गुरुदत्त जन्म उत्सवानिमित्त फुलांचा कार्यक्रम व रात्री 9 वाजता रात्री सावंतवाडी भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम होणार आहे.
मृदंगमणी लक्ष्मण चंद्रू डाकवे, गायक सचिन महाराज डावरी, संपत महाराज काटेकर, अशोक महाराज काटेकर, नामदेव महाराज, कांता महाराज, ज्ञानदेव जाधव, विजय शिरंबेकर असून चोपदार म्हणून ह.भ.प.पांडुरंग जाधव महाराज, पेटीवादक अशोक महाराज काटेकर, विणेकरी ह.भ.प.महादेव पांडुरंग डाकवे आहेत. व स्पिकरची व्यवस्था मारुती शा. डाकवे (जय माता दी साऊंड सर्व्हिस) यांची आहे.
हरिपाठ व काकडा यासाठी ह.भ.प.सचिन महाराज डावरी, संपत महाराज काटेकर, अशोक महाराज काटेकर, दिनेश महाराज डाकवे, ब्रम्हा महाराज डाकवे, तुकाराम मारुती डाकवे, शामराव रामचंद्र डाकवे, पांडुरंग जाधव, लक्ष्मण मस्कर, हरी किसन डाकवे, लक्ष्मण घाडगे, तुकाराम बंडू डाकवे, तुकाराम गणपती डाकवे, तुकाराम रामचंद्र डाकवे, सुर्यकांत हरी डाकवे, लक्ष्मण बापू डाकवे, मिनाक्षी तुकाराम डाकवे, जिज्ञा जगन्नाथ डाकवे, साक्षी शिवाजी मस्कर, ज्ञानेश्वर लक्ष्मण डाकवे, विठ्ठल राजाराम डाकवे, प्रांजली डाकवे, अविनाश डाकवे, काशिनाथ यशवंत डाकवे, आनंदा घाडगे, गणेश डाकवे, अंकुश डाकवे, कार्तिक डाकवे, पियुष जाधव, शुभम डाकवे, रामदास डाकवे, नंदा मस्कर, सुनंदा डाकवे, कलाबाई डाकवे, दत्ता डाकवे, साहिल डाकवे, विठ्ठल रामचंद्र डाकवे, रामचंद्र शामराव डाकवे यांची साथ लाभणार आहे.
याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 गुरुचरित्र ग्रंथवाचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व नंतर जागराचा कार्यक्रम होईल.
आचरेवाडी, भरेवाडी, येळेवाडी, मस्करवाडी, मळाईचीवाडी, निवी, सलतेवाडी, डाकेवाडी (वाझोली) या व पंचक्रोशीतील भजनी मंडळे कीर्तनाला साथ करणार आहेत.
तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ डाकेवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी (काळगांव) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ह.भ.प. वसंत महाराज डाकवे यांच्याशी संपर्क साधावा.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top