ताज्या बातम्या

संविधान दिनी राजभवन येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक, अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top