ताज्या बातम्या

मुंबईत तब्बल ११ लाख ‘दुबार’ मतदारांची नोंद — निवडणूक आयोगाचे मौन कोणाच्या फायद्यासाठी?; काँग्रेस आक्रमक

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून या यादीत तब्बल ११ लाखांहून अधिक दुबार मतदारांची नोंद आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगामी नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या आकडेवारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेसने थेट निवडणूक आयोगावर सवाल उभा केला आहे.यापैकी मिळालेल्या आकडेवारीनुसार पश्चिम उपनगरात ४,९८,५९७ दुबार मतदार आहेत.
पूर्व उपनगरात ३,२९,२१६ दुबार मतदार, शहर विभागात २,७३,००० दुबार मतदार असल्याचे आढळले आहेत.

काही मतदारांची नावे दोनपेक्षा अधिक वेळा नोंदवली असून अनेक विभागांत दुबार मतदार यादीमुळे संख्या कृत्रिमरीत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अगदी काहीशा मतांच्या फरकाने विजय-पराजयाचे महत्व ठरते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली नावांची पुनरावृत्ती कोणाच्या फायद्यासाठी केली गेली याबाबत आता राजकीय संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेसच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी थेट प्रश्न उपस्थित करत म्हटले,

“मुंबईत ११ लाख दुबार मतदार आहेत — हे नेमके कुणाच्या सूचनेवर आणि कुणाच्या फायद्यासाठी केले गेले? निवडणूक आयोगाने तातडीने याचे उत्तर द्यायला हवे. मतदार यादीतील अनियमितता दूर न करता निवडणूक घेतली गेली तर लोकशाहीची बूज राखली जाणार नाही. याविरोधात काँग्रेस लढण्यासाठी तयार आहे.

शहरात निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू असताना मतदार याद्यांतील अनियमितता, संख्या वाढविण्याची शंका आणि दुबार नावांची प्रचंड भर यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोगाकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि तातडीची कारवाई होते का, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top