कराड(प्रताप भणगे ) – कराड तालुक्यातील नारायणवाडी गावाला कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रताप पाटील तसेच गावाचे प्रशासक श्री बोलके यांनी भेट देऊन विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला.
भेटीदरम्यान ग्रामस्थांनी राबवलेल्या श्रमदान उपक्रम,स्वच्छता अभियान, तसेच गावात सुरू असलेल्या इतर सामाजिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. नारायणवाडी हे गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी प्रशंसनीय प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामस्थांच्या सहभागामुळे गावात घडत असलेल्या सकारात्मक बदलांबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही मान्यवरांनी आपल्या व्यस्त वेळातून गावाला दिलेल्या भेटीबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.
नारायणवाडी गावाची ही प्रगतीशील वाटचाल व नारायणवाडीचा बदलता चेहरा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात नक्षीस मिळविण्यास मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.




