ताज्या बातम्या

नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार आणि 50 लाखांची फसवणूक…. भोंदूबाबा गणेश जगताप फरार; इंदिरानगर पोलिसांचा शोध सुरू

प्रतिनिधी : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत, एका महिलेचे 14 वर्षे लैंगिक शोषण आणि तब्बल 50 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणेश जगताप असे या भोंदूबाबाचे नाव असून, पीडित महिलेच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या पतीचे दारूचे व्यसन घालवून देतो, अशी खोटी विश्वासार्हता निर्माण करून जगतापने महिलेवर अत्याचार सुरू केले. पीडितेचा पती आणि आरोपी दोघेही एका मंडप डेकोरेटर्स संस्थेत काम करत होते. जगताप व्यवस्थापक असल्याने त्याचे पीडितेच्या घरी येणे-जाणे वाढले आणि त्याचा गैरफायदा घेत त्याने महिलेला भीती, दबाव आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, “स्मशानात पूजा करतो”, “तू मला आवडतेस”, “शरीरसंबंध ठेवले नाहीस तर तुझ्या मुलांपैकी एकाचा बळी जाईल”, अशा धमक्या आणि मानसिक त्रास देत आरोपीने पीडितेशी अनेकदा जबरदस्तीचे संबंध ठेवले. आरोपीकडे सापडलेल्या एका पुस्तकात पीडितेच्या नवऱ्याचे आणि मुलांची नावे लिहिलेली आढळली. तसेच त्याने काही ‘पावडरचे चाटण’ देऊनही अत्याचार केले असल्याचे पीडितेने सांगितले.

यापूर्वीही गणेश जगतापचा गुन्हेगारी इतिहास काळा असून, 2020 मध्ये सोने फसवणूक प्रकरणात त्याला अटक झाली होती. अशाप्रकारचे इतरही अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. आता पुन्हा एकदा त्याचा भोंदूपणा आणि अत्याचार समोर आला आहे.

सध्या गणेश जगताप फरार असून, इंदिरानगर पोलिसांकडून त्याचा जोरदार शोध सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top