कराड( वार्ताहर ) येवती ता. कराड येथे सोनार की नावाच्या शिवारात गेल्या कित्येक दिवसापासून बिबट्याचा मुक्त वावर आहे, ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या मालकीच्या शेतामध्ये बिबट्याने दुपारी चार वाजता शेतामध्येच चरण्यासाठी बांधलेल्या म्हैशीवर अचानक हल्ला करून म्हैशीस घायाळ करण्याचा प्रयत्न केला ,मात्र वेळीच शेतकरी आनंदा साधू शेवाळे यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे म्हैस थोडक्यात बचावली, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या शिवारामध्ये त्यांच्या मालकीची म्हैस शेतामध्ये चरण्यासाठी बांधली होती त्याच वेळेस दबा धरून बसलेल्या बिबट्याने म्हैशी वरती हल्ला करायचा प्रयत्न केला मात्र वेळीच म्हशीने शिंगाद्वारे बिबट्याला हाकलवून लावण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळीस शेतामध्ये असलेले शेतकरी आनंदा साधू शेवाळे हे देखील धैर्याने पुढे येऊन बिबट्याला काठीने हाकलण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे बिबट्याने लगेच धूम ठोकली, आणि त्याचमुळे म्हैस खऱ्या अर्थाने वाचली त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे, मागील काही दिवसापासून सोनारकी ,पाण्याची टाकी या परिसरात बिबट्या खुल्या फिरत आहे त्यामुळे येथील शेतकरी दिवसा सुद्धा शेतामध्ये जाण्यास घाबरत आहेत वेळीच या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करून पिंजरे लावावेत अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून केली जात आहे ,




