प्रतिनिधी : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेली आशीर्वाद यात्रा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेच्या उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव, अभिनेते गोविंदा यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही आशीर्वाद यात्रा पार पडली. यात्रेला भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, मनसे नेते संदीप देशपांडे आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेलवन, आमदार सदा सरवणकर, आमदार मनीषा कायंदे भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, माजी आमदार तुकाराम काते, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आशीर्वाद यात्रेत संवाद साधताना राहुल शेवाळे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मी केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास कायम ठेवून पुन्हा एकदा जनता दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीला विजयी करेल, याची मला खात्री आहे.
चेंबूरच्या पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून शनिवारी सुमारे साडे अकरा वाजता आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. चेंबूरहून निघालेली हे आशीर्वाद यात्रा सुमन नगर मार्गे सायन, धारावी 90 फीट रोड, जी टि बी स्टेशन , वडाळा, टिळक ब्रिज प्लाझा सिनेमा आणि त्यानंतर सेना भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सांगता झाली. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दक्षिण मध्ये मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवरांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून आशीर्वाद घेतला.