नवी मुंबई

: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहटोली, ठाणे तसेच शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा, खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र २८ वाशी येथे सुरू झाले आहे.
जिल्हा स्तरीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या श्रीम.सुजाता अरुण चौधरी,श्रीम. सोनाली हरी श्री.विजय पवळे, श्रीम.ज्योत्स्ना चौधरी, श्रीम.दीपक चव्हाण, श्रीम.नारायण लांडगे, श्रीम.माधुरी शिनकर, श्रीम.भावना पवार, श्रीम.पंकज अशोक बोराडे,श्रीम. विनोद यादव, श्रीम.शशी सिंग, श्रीम.नयना रसाळे, श्रीम.गीता लिमजे, श्री.विजय हांडे,श्रीम. वृषाली परदेशी, श्रीम.वैशाली देशमुख, श्रीम.सुवर्णा मिसाळ, श्री.स्वप्निल सोळंकी, श्री.दीपक महाला, श्री.नवनीत चौधरी, श्रीम.विजयमाला बारसिंग यासह इतर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई मनपा हद्दीच्या शाळेतील तब्बल 1681 शिक्षकांना 5 बॅच मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यानुसार पहिली बॅच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 28, वाशी येथे संपन्न झाली आहे.
मा. श्रीम.संघरत्ना खिल्लारे मॅडम (शिक्षण उप आयुक्त, शिक्षण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका), मा. श्री.अशोक कडूस (शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचे नियोजन प्रशांत म्हात्रे (केंद्र समन्वयक) यांनी केले आहे.
प्रशिक्षण उद्घाटन समारंभात श्रीम.सुलभा बारघरे (शिक्षण विस्तार अधिकारी),श्री. प्रशांत म्हात्रे (केंद्र समन्वयक),श्री. महेंद्र पाटील (केंद्र समन्वयक), श्रीम.साळी ( केंद्र समन्वयक ), श्रीम. शुभदा शिर्के (प्रशिक्षण समन्वयक), श्रीम. संगीता घरदाळे (विषयतज्ञ्), श्रीम. बसविस्कर यांनी सरस्वती पूजन करत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण दरम्यान मा. अशोक कडूस (शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका), यांनी भेट देऊन सदरील मुल्यवर्धन उपक्रमामुळे भविष्यातील पिढी ही संस्कार संपन्न घडेल असा विश्वास व्यक्त केला. मा.डॉ.संजय वाघ सर (प्राचार्य – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहटोली, ठाणे) यांनी प्रशिक्षणांस भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे समन्वयक श्री.भाग्यश्री भिलोरे, श्री.प्रशांत भालेराव श्रीम.वृषाली दिनकर यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन शिक्षकांना मुल्यवर्धन प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.




