मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने 2025 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी महिला आरक्षणासाठीची सोडत जाहीर केली आहे. ही सोडत वांद्रे (प.) येथील बालगंधर्व रंगमंदिरात 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येईल. सोडतीनंतर मसुदा आरक्षण यादी जाहीर होईल.
नागरिकांना 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आक्षेप व सूचना नोंदवता येणार आहेत. पारदर्शकतेसाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले असून, BMCच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध आहे.




