तळमावले/वार्ताहर : स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, डाकेवाडी (काळगांव) या नावाच्या बोधचिन्हाचे अनावरण थाटात संपन्न झाले. ग्रामीण भागात वाचनाची चळवळ उभी राहण्यासाठी हे वाचनालय नक्कीच योगदान देईल, असे प्रतिपादन साम टीव्ही न्यूज चे संपादक निलेश खरे यांनी केले.
दरम्यान, निलेश खरे व अन्य मान्यवर यांनी याबाबत माहिती घेवून वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत संदीप डाकवे यांना शुभेच्छा दिल्या.
समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त डाकवे परिवाराने सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सुरु करण्याचा संकल्प केला होता. या वाचनालयाचे अनौपचारिक उद्घाटन दि.18 सप्टेंबर, 2024 रोजी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड. जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त पोलीस ऑफीसर संभाजीराव पाटणकर, प्रा.ए.बी.कणसे, देवबा वायचळ, ग्रामीण लेखक ज्ञानदेव मस्कर, शिवम् असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), नितीन पाटील, अक्षय पाटील, आप्पासोा निवडूंगे, जगन्नाथ टेळे, कृष्णा डाकवे (गुरुजी), विठ्ठल डाकवे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.
संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, डाकेवाडी (काळगांव) या नावाचे संस्था नोंदणी प्रमाणपत्र 23 सप्टेंबर, 2025 रोजी मिळाले आहे. या वाचनालय व ग्रंथालयाचे बोधचिन्ह सातारा जिल्हयातील सुप्रसिध्द कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केले आहे. या बोधचिन्हामध्ये राजाराम डाकवे यांची छबी, पुस्तके याची अप्रतिम रचना केली आहे.
बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे, सुत्रसंचालन सौ.अंजली गोडसे तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे फौजी, चंद्रकांत चव्हाण, यशराज चव्हाण, गुलाब जाधव फौजी, भिमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पुनम जाधव, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकटीत : वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठीचे उपक्रम :
भविष्यामध्ये वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने वृत्तपत्रलेखन, निबंध, चित्रकला, काव्य स्पर्धा, तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धा, मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, तात्याश्री साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, कवी संमेलन, पुस्तक भेट अभियान असे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मत संदीप डाकवे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल डाकवे, सेक्रेटरी रेश्मा डाकवे, खजिनदार संजय डाकवे, कार्यकारिणी सदस्य विकास डाकवे, भरत डाकवे, प्रथमेश डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
