Wednesday, October 29, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई स्थित सावंतवाडी करांनी जपली सामाजिक बांधिलकी

मुंबई स्थित सावंतवाडी करांनी जपली सामाजिक बांधिलकी

मुंबई(अमोल पाटील) : मुंबईमधील रहिवाशी असणारे मंडळी,गावच्या व्हाट्सअप “माऊली” या ग्रुपद्वारे वर्गणी काढून गरजवंत व्यक्तींना आर्थिक साहाय्य करत सामाजिक बांधिलकीचा पाया रचला आहे.समाजहीत आणि बंधुभाव जोपसणाऱ्या श्री गणराज युवा प्रतिष्ठाण अंतर्गत श्री बालवीर गणेश मित्र मंडळ, सावंतवाडी ता. शिराळा तर्फे आदर्श उपक्रम राबवत सामाजिक कामे करत आहेत आणि समाजातील गरीब गरजू व्यक्तींची मदत करत आहेत.
गावामधील वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना, गावात मंडळाची स्वतःची पाणी योजना कार्यान्वित करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे.गावात भव्य आणि सुंदर अश्या शिवमंदिराची स्थापना करून त्यासाठी सभामंडप ही मंडळाने स्वखर्चाने कोणतीही शासकीय राजकीय मदत न घेता निर्माण केलेला आहे.
गावात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले जातात.व्यसन मुक्ती हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी सर्वजण मनस्वी कार्य करतात.
गावात असलेल्या गणेश मंडळाचेही वैशिष्ट आहे, डीजे विरहित मिरवणूक आणि सांप्रदायिक दिंडी असे कार्यक्रम राबवले जातात.. वार्षिक महाशिवरात्री कार्यक्रम ही अत्यन्त उत्साहात आणि सांप्रदायिक वातावरणात साजरा होतो…
मंडळाने नुकत्याचं केलेल्या जाहीर आवाहनास प्रतिसाद दिला व सावंतवाडी गावचे शेतकरी आणि मंडळाचे सदस्य असणाऱ्या श्री विठ्ठल रामचंद्र बेंगडे यांना चालू वर्षीच्या अतिवृष्टीमुळे पेरणी करता आली नाही,त्यामुळे त्यांच्यावर अत्यन्त हालाकीची परिस्तिथी ओढवली होती, भीतीपोटी त्यांनी आत्महतेचा प्रयत्न केला होता त्यांना मानसिक उदासीनते मधून बाहेर काढण्यासाठी,त्याच्यावर आलेल्या बिकट प्रसंगामध्ये त्यांना साथ करून त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक सहयोग केला.यासाठी प्रत्येक सदस्यांनी वर्गणीद्वारे विठ्ठल यास पंचवीस हजार रुपये रोख रकम चे आर्थिक साहाय्य केले,,अनेकदा असे सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत,,
“एक हात मदतीचा.”.. या संकल्पनेतून यापूर्वीही गावातील आकस्मिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच वीज पडून मृत्यू पावलेल्या बैल, गायी मालकांच्या आणि बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या तसेच अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या ठामपणे कायमस्वरूपी मदतरू करून सामाजिक सलोखा राखणे आणि माणुसकी जोपासने हे मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
गणराज युवा प्रतिष्ठाण चे मुख्य मार्गदर्शक श्री विकास आण्णा सावंत(संस्थापक-माऊली ग्रुप) यांनी आवाहन केले आहे कि, आमच्या श्री गणराज युवा प्रतिष्ठाणच्या या सामाजिक प्रगतीच्या प्रवाहात सावंतवाडी गावातील आणि परिसरातील सर्वच 100%युवकांनी सामील व्हावे.आणि समजहिताच्या कार्यात सहभाग घ्यावा. असे आव्हान करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments