ताज्या बातम्या

अभिनेता गोविंदा याचा शिंदे गटात प्रवेश

उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढण्याचे

प्रतिनिधी : अभिनेता गोविंदा अहूजा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षात प्रवेश  केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा आणि भगवा गमछा त्यांच्या गळ्यात घातला आणि आज (28 मार्च) हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे, कृषीमंत्री दादा भूसे, मिलींद देवरा, यांच्यासह अनेक शिवसेना नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जवळास प्रदीर्घ काळानंतर मी राजकारणात पुन्हा सक्रीय होतो आहे. मला सुरुवातीला वाटले नव्हेत की, मी या बाजूला म्हणजेच राजकारणात पुन्हा सक्रीय होईल. पण, परमेश्वराची कृपा मोठा वनवास संपवून मी पुन्हा या क्षेत्रात पदार्पण करतो आहे, असी भावना या वेली अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केली.

अभिनेता गोविंदा यांनी पुढे बोलताना म्हटले की, या आधी काही वर्षांपूर्वी मी 10 मिनीटांचे भाषण केले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी आज पुन्हा आपल्यासमोर बोलतो आहे. माझ्या एकूण करीअरमध्ये राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुळ बाळासाहेब ठाकरे यांची माझ्यावर कृपा राहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझ्या आईवडीलांचे चांगले संबंध होते. प्रदीर्घ काळानंतर मी मराठीमध्ये बोललो. आज राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास पाहायला मिळतो आहे. पूर्वीच्या तुलनेत मुंबई शहराचाही विकास घडतो आहे, असे कौतुकोद्गारही गोविंदा यांनी या वेळी काढले. 

अभिनेता गोविंदा यांचे मी शिवसेना पक्षात स्वागत करतो. शिवसेना पक्षात त्यांना मान-सन्मान आणि सर्व काही मिळेल, काम करण्याची संधी मिळेल, असे उद्गार या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी गोविंदा यांनी कोणत्याही प्रकारच्या नियम, अटी घातल्या नाहीत. शिवसेना आणि सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहून ते प्रभावीत झाले आणि त्यांनी पक्षात प्रवेश केला. दरम्यान, त्यांना लोकसभा निवडणूक लढणार का? असे विचारले असता शिंदे म्हणाले, गोविंदा यांनी तशी अजून काही मागणी केली नाही. पण पक्षाचे काम करण्यासाठी ते नेहमी तत्पर राहतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

https://youtu.be/qNAlmRRsu-E?si=HnSrYOHX8Sx3ImwF

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top