प्रतिनिधी : जावली तालुक्यातील क्षेत्र आंबेघर येथे यंदा कार्तिकी एकादशी निमित्त भव्य वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. प्रविण महाराज शेलार यांच्या प्रेरणेने आणि सर्व भक्तांच्या सहकार्याने उभा राहिलेला श्री विठ्ठलधाम प्रतिपंढरपुर आता भाविकांसाठी आस्था आणि श्रद्धेचे केंद्र बनले आहे. साक्षात पंढरपूरचा राजा श्री विठ्ठल येथे विराजमान झाला असून, प्रत्येक एकादशीला हजारो भाविक दर्शन व प्रसादाचा लाभ घेत आहेत. पंढरपूरला जाणे अनेकांना शक्य नसल्यामुळे या प्रतिपंढरपुरात सर्वांना श्री पांडुरंगाचे दर्शन मिळावे, या उद्देशाने हा वारी सोहळा सुरू करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पुढीलप्रमाणे:
रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ (कार्तिकी एकादशी) रोजी सर्व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. सायंकाळी ६ ते ८ वाजता कीर्तन सोहळा होणार आहे.
द्वादशीला सकाळी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होईल.
येणाऱ्या सर्व भाविकांसाठी स्वागत व फराळ प्रसादाची व्यवस्था केली आहे. ह.भ.प. प्रविण महाराज शेलार यांनी सर्व महिला, पुरुष आणि अबालवृद्धांना आवाहन केले आहे की, “या पवित्र वारीसोहळ्यात सहभागी होऊन श्री पांडुरंगाच्या चरणी आपले मन अर्पण करा आणि भक्ति, आनंद, आणि एकात्मतेचा अनुभव घ्या. असे आवाहन करण्यात आले आहे.
