प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई यांच्या ६४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे संचलित श्री ज्योतिर्लिंग विद्यालय, जिंती (ता. कराड, जि. सातारा) येथील विद्यार्थिनी कुमारी आर्या शहाजी देसाई हिने मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि संस्थेचे नाव राज्याच्या स्तरावर उंचावले.ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनीचा मुख्याध्यापक महामंडळाच्या अधिवेशनात गौरव करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्याध्यापक महामंडळाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ‘प्रा. दीपक तडाखे प्रस्तुत स्वर्णांगण ग्रुप, कराड’ यांचा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम ‘नृत्याविष्कार २०२५’ सादर झाला.
श्री ज्योतिर्लिंग विद्यालय, जिंतीची इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी आर्या शहाजी देसाई हिची महाराष्ट्रीयन लावणी नृत्य सादर करण्यासाठी निवड झाली होती. आर्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि कलात्मकतेने लावणी सादर केली, ज्यामुळे तिला उपस्थितांकडून भरभरून ‘वाहवा’ मिळाली.
आर्याच्या उत्कृष्ट कला सादरीकरणामुळे मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने तिला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, तिचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक कोठावळे यांनाही स्टेजवर बोलवून यांच्या समक्ष करण्यात आला व शाळेच्या उपक्रमाबद्दल शाळेचा गौरव करण्यात आला यावेळी विद्यालयातील शिक्षक, जिंती गावातील ग्रामस्थ, ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती यांच्याकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.
जिंतीच्या ‘आर्या’ची राज्यस्तरीय लावणीने घेतली ‘वाहवा’!
RELATED ARTICLES
