मुंबई (शांताराम गुडेकर) : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईगल फौंडेशनचे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये सर्वश्री श्री संजय कुंडलीक जाधव ( कृषी ), उद्योग क्षेत्रातून अस्लमभाई सय्यद,श्री संभाजी हिंदूराव माळी,ॲड.प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे (सरकारी वकील ), वैद्यकीय क्षेत्रातून डॉ.राजेंद्र नामदेव कवठेकर, श्री तुकाराम बाबू बंडगर व सौ. स्वाती तुकाराम बंडगर, पत्रकार क्षेत्रातून श्री युवराज आनंदराव निकम ( दै. तरुण भारत ), पत्रकार श्री चंद्रकांत गुरव (दै. बंधुता ),सामाजिक क्षेत्रातून श्री अशोक गोरड, गोपाल जगदेव भावसार,सौ. राधिका गोपाल भावसार ,श्री प्रदीप महादेव खोत,शैक्षणिक क्षेत्रातून श्री राजकुमार कांबळे,श्री प्रताप शिरतोडे, प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम,श्री अशोक जनार्दन पाटील, श्रीमती शैला गंगाधर बैसाणे, प्रा. डॉ. दिलीप गाडे,प्रा. लहूकुमार दिनकर थोरात,प्रा. सोमनाथ लांडगे,प्रा. राम घुले, सौ. अर्चना सुधर्मा डाके, प्रा. संजय नकटू लेनगुरे, प्रा. सौ. रेखा रमेश कटके, प्रा.दिलीप हिरा बरकडे, श्री पोपट माणिकराव काटकर, साहित्य क्षेत्रातून श्री रावसाहेब अर्जुन मुरगी,श्री सुदाम दगडू धाडगे,सौ. लिना बाळासाहेब पांडे,सौ. प्रतिभा पांडूरंग थोरात, सौ. गायत्री मोहाडीकर, सौ. सुनिता गढळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर सोहळा रविवार, दि.९ नोव्हेंबर २०२५, सकाळी १० वाजता,डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनियरींग कॉलेज,आष्टा, जि. सांगली येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, पदाधिकारी सर्वश्री श्री.सागर पाटील, श्री. बाबासाहेब राशिनकर, श्री दिनेश कांबळे, प्रा.महेश मोटे,श्री संजय थोरात, प्रा.दिलीप जाधव,पत्रकार प्रशांत चव्हाण,श्री.विजय जगताप, श्री. भास्कर सदावर्ते यांनी दिली.
ईगल फौंडेशन चे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES
