Friday, October 24, 2025
घरमहाराष्ट्रभांडूपगावात किल्ला स्पर्धेचे आयोजन

भांडूपगावात किल्ला स्पर्धेचे आयोजन

मुंबई (पंकजकुमार पाटील): सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या संस्थेचे ७६ वे वर्षे आहे. या दीपोत्सवाच्या निमित्ताने किल्ला स्पर्धा भांडूपगाव येथे घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष परशुराम कोपरकर यांच्या संकल्पनेतुन लहान मुलांमध्ये ऐतिहासिक मूल्यांची जपणूक व्हावी, या हेतूने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण जयकांत शिखरे, जगदीश धनमेहेर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव धनंजय म्हात्रे, कार्याध्यक्षा रजनी पाटील, खजिनदार महेश पाटील, उत्सव समितीच्या अध्यक्षा ममता उलवेकर, सचिव दिनेश कोपरकर तसेच महेश कोपरकर, महेंद्र कुरकुटे, वर्षा वाघिलकर, सोनम कोपरकर, सरिता म्हात्रे, उमा मळेकर, उषा काकडे, प्रवीण पवार, डॉ. देविदास केनी, हेमा भोईर, स्मिता मिसाळ, सृष्टी वाघीलकर,विजय कडव, प्रशांत काकडे, हेमंत वाघिलकर, सिद्देश वायगंकर, भारती किनी,दिनेश कोपरकर, संजय उलवेकर, प्रविण पवार, दयानंद पवार, प्रमिला कोपरकर, राहुल खराटे, रजनी पाटील, सृष्टी वाघिलकर, वर्षा वाघिलकर, दीपाली पाटील, सरिता म्हात्रे, भारती किनी, चारुशीला पाटील, विशाखा भोईर, राजेंद्र गावकर, पल्लवी खारकर, प्रमिला कोपरकर, स्मिता मिसाळ, आदि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments