कराड : कराड ग्रामीण भागातील लोकप्रिय समाजसेवक, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक श्री. मोहनराव नायकवडी (मामा) यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्रेयस मोहनराव नायकवडी,यश नायकवडी हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत.
हा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी मौजे घोगाव, ता. कराड येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन मा. आमदार श्री. अमोल मिटकरी (विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य / प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या शुभहस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा. खा. श्री. नितिन पाटील (काका), खासदार राज्यसभा व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य राहणार आहेत.
यावेळी सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, त्यात —
अॅड. श्री. उदयसिंह पाटील-उंडाळकर (दादा), चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना,
मा. श्री. बाळासाहेब सोळस्कर (अध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),
मा. श्री. संजय देसाई (कार्याध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),
मा. सौ. सीमा जाधव (अध्यक्षा, सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),
मा. श्री. पृथ्वीराज गोडसे (अध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी),
मा. श्री. प्रदीप विधाते (अध्यक्ष, ओ.वी.सी. सेल व संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक)
आदींसह अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचे आयोजक श्री. अमितराज चव्हाण व श्री. विशाल चव्हाण (अध्यक्ष, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन / मार्गदर्शक, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन) असून, कार्यक्रमाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.
कराड ग्रामीण भागात क्रिकेटच्या माध्यमातून तरुणाच्या अगदी जवळ गेलेले युवा उद्योजक श्रेयस मोहनराव नायकवडी,यश नायकवडी यांच्या पक्षप्रवेशामुळे कराड दक्षिण मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सोहळ्याची सर्वत्र उत्सुकता असून, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.