सातारा(अजित जगताप) : गेले सात वर्ष रखडलेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्याला खात्रीने उमेदवारी मिळेल. असा आत्मविश्वास असणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली आहे. त्यांच्या नावाची चर्चा होत असतानाच दुसऱ्या बाजूला नगरसेवक होण्याची स्वप्न नुसतीच पाहणाऱ्या व्यक्तीचा संपर्क तुटल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असं गृहीत धरून मतदारांनी ही आपली मानसिकता तयार केली आहे. माघारी घेणाऱ्या काही सराईत उमेदवारांबद्दलही गरीबी हटाव योजना अशी टिंगल टवाळी होऊ लागलेली आहे.
सातारा नगरपालिकेकडे सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीकडे मध्ये काटे की टक्कर झाली होती. पोलीस ठाणे, कोर्टकचेऱ्या व पुन्हा मनोमिलन झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. सातारा नगरपालिकेमध्ये प्रभाग वाढ झाल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये बॅनरबाजी व समाज माध्यमावर विश्वास ठेवण्यापेक्षा थेट प्रभागातील मतदारांची संपर्क ठेवण्यासाठी संपर्क रचना आखली आहे. त्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळणार आहे.
वास्तविक पाहता सातारा नगरपालिकेची सत्ता ही भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विचाराने प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रसिद्धी पत्रकात हे दोन्ही राज्यांचे फोटो दिसत असले तरी काही ठिकाणी एका राजाचे फोटो पाहून दुसऱ्या राजांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झालेले आहे. ही निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक नाराज मंडळी हे निवडणूक लढवण्यासाठी गट, तट, पक्ष, व्यक्तीनिष्ठा बाजूला ठेवतीलच परंतु, त्यांना छुपा पाठिंबाही मिळाल्यास नवल वाटणार नाही. इतर मागासवर्गीय प्रभागांमध्ये कुणबी मराठा उमेदवारांना उमेदवारी दिल्यास काही मराठा मतदार हे त्यांना जशा पद्धतीने पाठिंबा देणार आहेत. तशाच पद्धतीने सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय प्रभागांमध्ये इतर मागासवर्गीय हे कुणबी मराठा वगळता इतर उमेदवारांना मत देण्याची दाट शक्यता आहे. तशा पद्धतीने बैठका सुरू झाल्या आहेत. यामध्ये समाज माध्यमावर चमकू गिरी करणाऱ्यांना वगळले आहे. तर नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी मात्र प्रत्यक्षात सर्वांना दिवाळीची मदत करून आपली प्रतिमा चांगलीच उजाळून टाकलेली आहे. त्याची संपूर्ण साताऱ्यात चर्चा होऊ लागलेली आहे.
सातारा नगरपालिकेमध्ये आरक्षणामुळे नगराध्यक्षपदी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्यामुळे अनेकांना नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पडत आहे. त्यातील जे म्होरके आहेत. त्यांना पहिल्याच पायरीवर धोबीपछाड करण्यासाठी अंतर्गत यंत्रणाही कामाला लागलेले आहे. अशा कार्यकर्त्यांना सातारा नगरपालिकेचा दरवाजा पर्यंत जाण्यासाठी रोखणे. हाच आता एक कलमी कार्यक्रम काहींनी स्वीकारलेला आहे. डिसेंबर- जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा महिना असतो. अशा वेळेला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी उब द्यावी लागणार आहे. त्याचीही तरतूद इच्छुकांना करावी लागेल हाच धागा पकडून नेत्यांनीही उमेदवाराची चाचपणी करताना त्याची आर्थिक परिस्थिती व समाजातील स्थान आणि पक्षनिष्ठा व नवीन चेहरा याची सांगड घातली जाणार आहे. फक्त नेत्यांच्या पुढे मागे हिंडणाऱ्या संधी साधून ना उमेदवारी नको. कारण, लोकसभेला व विधानसभेला अशा लोकांनी ज्या गमजा केलेल्या आहेत. त्याची पक्की खबर नेत्यांना देण्यात आलेले आहे. हे सुद्धा विसरता येणार नाही. सध्या भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक त्यांच्यापुढे डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार ही पदवी लावण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक झालेले आहेत. सध्या संपर्कहीन असलेल्या उमेदवारांनी बेडकासारखे कितीही फुगण्याचा प्रयत्न केला. तरी तळ्यातच आपली ताकद दाखवतो. त्याला नदी किंवा समुद्रात जाण्यापर्यंत शक्तीच राहत नाही. हे सुद्धा सातारकरांनी अनुभवले आहे.
_____________________
फोटो —
साताऱ्यात इच्छुकांचा संपर्क नसल्याने मतदारांना नवीन चेहऱ्याची अपेक्षा…
RELATED ARTICLES