मुंबई : प्रजासत्ताक जनता वृत्तपत्राचे संपादक सुबोध शाक्यरत्न आणि धारावीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवराम कासारे यांच्या मातोश्री शकुंतला शिवराम कासारे (वय.८५) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी धारावी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धारावी येथील मूळ रहिवासी असलेल्या शकुंतला कासारे यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.