Sunday, October 19, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेह...

नवी मुंबई मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेह संमेलन

प्रतिनिधी :


नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या लोकोपयोगी सेवा सुविधांची, प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमांमार्फत होत असून नागरिकांच्याही अडी-अडचणी, सूचना यादेखील प्रशासनापर्यंत प्रसारमाध्यमांमार्फत पोहचत असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमे ही नागरिक आणि महापालिका यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा असून देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात साज-या होणा-या दिवाळी सणाच्या निमित्ताने माध्यम प्रतिनिधींशी संवाद व्हावा आणि विचारांचे, शुभेच्छांचे आदान-प्रदान व्हावे याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेनुसार दिवाळी स्नेहसंमेलनासारखा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिशय उत्साहात राबविण्यात आला. यावेळी विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसारमाध्यम प्रतिनिधी व कॅमेरामन यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या नावलौकिकात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. इतर शहरांपेक्षा आपले नवी मुंबई शहर वेगळे असून स्वच्छतेप्रमाणेच आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुरु असलेल्या उल्लेखनीय कामांबद्दल माहिती देत आगामी काळात राबविण्यात येणा-या सुविधा कामांचीही त्यांनी माहिती दिली. नवी मुंबई पर्यटनदृष्ट्या लोकप्रिय शहर व्हावे याकरिता केल्या जात असलेल्या नियोजनाचीही माहिती दिली. यावेळी आयुक्त महोदयांसमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, डॉ. अजय गडदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहा.आयुक्त श्रीम. अलका महापुरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या वतीने श्री.विनय म्हात्रे, श्री. दिनेश पाटील, श्री.विनायक पाटील, श्री.बाळासाहेब दारकुंडे, श्री.सुधीर शर्मा, श्रीम.अर्चना त्रिपाठी, श्री.काकडे व श्री. मनोज जालनावाला यांनी दिवाळी फराळासह स्नेहसंमेलनाचे आयोजन करुन एक चांगला संवाद माध्यम प्रतिनिधींशी साधल्याबद्दल मनोगते व्यक्त करतांना या संकल्पनेची प्रशंसा केली. यावेळी काही माध्यम प्रतिनिधींसह उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड व महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर यांनी कविता सादर केली. सर्वांच्या एकत्रित सहयोगातून प्रशासन व पत्रकार यामधील दिवाळी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments