तापोळा – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या महाबळेश्वर या तालुक्यातील तालुक्याचे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख म्हणून श्री गणेश नामदेव उतेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश उतेकर हे साहेबांचे निकटवर्तीय मानले जातात.
अभ्यासून व तरुण नेतृत्व गणेश उतेकर अनेक वर्ष सामाजिक काम करत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात. उत्तम वक्तृत्व शैली असल्याने सभा जिंकण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे.
सहकार व उद्योग क्षेत्रात काम श्रमजीवी सामाजिक सेवाभावी संस्थेत कामकाजाला सुरुवात केली कोयना माई महिला सहकारी पतसंस्था या संस्थेच्या उभारणीत गणेश जी होते कर यांचे मोठे योगदान आहे तापोळा विभागातील गावागावातील महिलांना संघटित करून बचतीची सवय लावणे व आर्थिक प्रगतीसाठी योगदान देणारी कोयनामही पद संस्था ही आग्रही सहकारी संस्था आहे आजही या संस्थेची अनेक महिला जोडल्या गेल्या आहेत
कृषी पर्यटन या व्यवसायाला गती देण्याचे काम गणेशजी उतेकर यांनी केले आहे तापोळा व परिसरात कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आल्यावर त्याला अनेक तरुण जोडून व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन दिले व स्वतःही एक यशस्वी व्यवसायिक उद्योजक म्हणून लौकिक प्राप्त केला आहे
मदतीसाठी कायम तत्पर कोरोना काळ व अतिवृष्टी यामध्ये गणेश उतेकर आणि त्यांच्या मित्र परिवाराने जवळपास दोन हजार कुटुंबापर्यंत विविध साहित्याच्या स्वरूपात प्रत्यक्ष मदत पोहच केली.
प्रशासकीय कालची आवड– शासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील एक दुवा म्हणून नेहमीच काम करत आले आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचे फॉर्म मोफत भरून देणे व आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तसेच शासन आपल्या दारी अशा उपक्रमांचाद्वारे ते सर्वसामान्य लोकांची प्रशासकीय कामे करून देण्यासाठी आघाडीवर काम करतात.
शिवसैनिकांचा विश्वास तापोळा विभागात शिवसेना हा पक्ष गेल्याने वर्ष मजबूत आहे त्याला मजबुती देण्यासाठी व नवीन शिवसैनिक जोडण्यासाठी तरुणांची एक फळी निर्माण करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आणि गावात शिवसेना विचाराचे सरपंच निवडून यावेत यासाठी त्यांनी परिश्रम घेतले त्याची परिमिती म्हणून आज अनेक गावात शिवसेनेचे सरपंच आहेत आणि ते विकासाच्या कामासाठी पुढाकार घेत आहेत. महाबळेश्वर तालुक्याचे शिवसेना पक्षाचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
हिंदुत्ववादी चेहरा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख ही अनेक वर्षापासून आहे झोळखिंड येथील वृद्ध व्यक्तीच्या संशयित मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महाबळेश्वर बंदची हाक दिली त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
योग्य निवड
आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जाते सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा निर्भीड वक्ता तालुकाप्रमुख झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे भविष्यात गणेश पक्षीय संघटना मजबूत करण्यासाठी भर देतील आणि पक्ष वाढीवर जोर दिला जाईल असे बोलले जात आहे. नेतृत्व. कर्तुत्व आणि वकृत्व असलेले गणेश उतेकर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.