कुडाळ (अजित जगताप ) : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात एकही पदवीधर नोंदणी पासून वंचित राहणार नाही. असा सार्थ विश्वास भारतीय जनता पक्षाची जावळी तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांनी व्यक्त केला आहे.
जावळीत खूप मोठी शैक्षणिक क्रांती झाली आहे . प्रत्येक घरामध्ये एक तरी पदवीधर आहेत. त्यामुळे जावळीकरांच्या बहुमूल्य मतांवर पुणे पदवीधर मतदार संघातील आमदार निवडून येणार आहे. जावळीच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. आदरणीय नेते व भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. आ. अतुल भोसले,
वसंतराव मानकुमरे , सौरभ शिंदे, सयाजी शिंदे यांची मोलाची साथ लाभत आहे.
जावळी तालुक्यात पदवीधर मतदार नोंदणी सुरू झाली आहे. कुडाळ येथील भाजप तालुका कार्यालयात पदवीधर व भाजप आणि महायुती कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी साठी विनामूल्य मार्गदर्शन मिळत आहे.
आतापर्यंत जावळी तालुक्यात सातशे ते एक हजार नवे जुने पदवीधर यांची नोंदणी करण्यासाठी जावळीतील संदीप
परामणे, विठ्ठल देशपांडे, श्रीहरी गोळे, प्रविण देशमाने, संदीप गायकवाड, नानासाहेब पवार, अभिजित दुदुस्कर व सुनिल पवार, प्रदीप शिंदे परिश्रम घेत आहेत.
जावळी तालुक्यातील पुणे पदवीधर मतदार नोंदणी साठी भाजप वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आदेश तंतोतंत पाळला जात आहे. वाडी वस्ती तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर व सार्वजनिक वाचनालये, अभ्यासिका या ठिकाणीही पदवीधर नोंदणी होत असल्याने सर्वत्र भाजप तालुकाध्यक्ष संदीप
परामणे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
सध्या कुडाळ, करहर, सायगाव, मेढा, कुसुंबी, केळघर परिसरात भाजप व महायुती तसेच घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी पदवीधर व शिक्षक नोंदणी उदिष्ट पूर्ण केले आहे. सध्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. एक ही पदवीधर नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची सातारा जिल्ह्यात भाजप पदाधिकारी काळजी घेत असल्याची माहिती भाजप निष्ठावंत प्रविण शहाणे,अमित कुलकर्णी व अमोल कांबळे यांनी दिली आहे. रायगाव तालुका जावळी येथील पदवीधर महिलांनीही कुडाळ भाजप कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करून पुणे पदवीधर मतदारसंघात मतदान करण्याचा निर्धार केला आहे. त्यांचे मनापासून श्री परामणे यांनी आभार मानले.
___________________
फोटो — पदवीधर मतदार कुडाळ भाजप कार्यालयात करताना जावळी भाजप तालुकाध्यक्ष संदीप परामणे…..( छाया — अजित जगताप, कुडाळ)