ताज्या बातम्या

सरन्यायाधीश अपमान विरोधी देशव्यापी मोर्चा

मुंबई(रमेश औताडे) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवर्ई यांच्यावर सनातनी विचारधारेने पछाडलेल्या राकेश किशोर यांनी अपमानास्पद हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पुरोगामी विचारसरणीला मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या निषेध व्यक्त करत १४ ऑक्टोबरच्या मोर्चाचे रूपांतर सनातनी विचारधारेत करावे असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले आहे.

आंबेडकरी समाजाचा मोर्चा १४ ऑक्टोबर ला मुंबई येथे निघणार आहे. त्या मध्ये समाजातील सर्व स्तरातील संघटना भाग घेणार आहेत. हा मोर्चा महाबोधी बुद्ध गया मुक्त करण्यासाठी आहे. परंतु सोबतच सरन्यायाधीश अपमान विरोधी हा मुद्दा घेऊन तीव्र निषेध करण्यात येणार आहे. या घटनेमागे कोणती शक्ती उभी आहे याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे बागडे यांनी सांगितले. मोर्चाच्या झंझावातासाठी आता पासूनच सभा, प्रचार, माध्यमातून जनतेला कळविले पाहिजे जेणेकरून राज्यभरातील सर्व स्तरातील संघटना,पक्ष, पुरोगामी विचारसरणीचे लोक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top