प्रतिनिधी : तुळसण येथील श्री निनाई देवी विद्यालयात पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने 100 आकाश कंदील तयार केले.
दीपावली चार दिवसांवर आली असल्याने आकाश कंदील व इतर साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. त्यातच दिवाळी सणानिमित्त घराघरात सजावट केली जाते आणि त्या सजावटीचे मुख्य आकर्षण ठरतो तो म्हणजे आकाश कंदील.
हा आकाश कंदील तयार कसा करायचा याचा प्रत्यक्ष अनुभव श्री निनाई देवी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, आनंदराव जानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास दादा प्रभावळे विद्योदय शिक्षक मित्र यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनवण्याचे कृतीयुक्त प्रशिक्षण दिले.
प्रत्येक विद्यार्थी आपला आकाश कंदील कसा चांगला होईल, याकडे लक्ष ठेवून उत्तम पद्धतीने प्रयत्न करत होते.
कार्यानुभव विषयांतर्गत कागद काम करताना कशा पद्धतीने कागद काढावेत, योग्य पद्धतीने कागद कसा चिकटवायाचा याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना कृतियुक्त प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी रघुनाथ पोतदार, वैभव जाधव, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर व विद्यार्थी उपस्थित होते.
इको फ्रेंडली आकाश कंदील बनवण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद….. श्री निनाई देवी विद्यालयात 100 कंदील तयार……
RELATED ARTICLES