मुंबई(रमेश औताडे) : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे महासचिव मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत देशव्यापी शांततापूर्ण बंदचे आवाहन केले.
त्यांनी वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ हा मुस्लीम समाजाच्या धार्मिक अधिकारांवर “काळा कायदा” असल्याचे सांगत तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. सुप्रीम कोर्टाचा अंतरिम निकाल केवळ आंशिक दिलासा देणारा असून हजारो मशिदी, कब्रस्ताने आणि ईदगाहांना धोका कायम असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शाकीर शेख व इतर सदस्य उपस्थित होते.
जर सरकारने हट्टीपणा सोडून हा कायदा मागे घेतला नाही, तर १६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर महासभा घेऊन निर्णायक लढा उभारण्याचा इशारा दिला.