सातारा : रयत शिक्षण संस्थेचा १०६ वा वर्धापन दिन शनिवारी दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संस्थेच्या सातारा येथील स्थानिक शाखांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा साताऱ्यातील कर्मवीर समाधी परिसरात सकाळी ११ वा. होणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सचिव विकास देशमुख यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी प्रा.इंद्रजित भालेराव उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे , संघटक डॉ. अनिल पाटील असून वर्धापन दिन सोहळ्याला सातारकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.