मुंबई : संकल्प सिद्धी ट्रस्टतर्फे अध्यक्षा दिव्या ढोले यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आज मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना हा धनादेश देण्यात आला. या माध्यमातून पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे.
“समाजावर संकट आले असता सर्वांनी एकत्र उभे राहून मदतीचा हात द्यावा, हीच खरी सेवा आहे,” असा संदेश या वेळी संकल्प ट्रस्टच्या वतीने अध्यक्षा दिव्या ढोले यांनी दिला आहे.