कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील घोगाव (जोतिबा नगर) येथे रेणुका माता देवालयात आणि गवारकरवाडी (येळगाव) येथील तुळजाभवानी मंदिरात विशेष धार्मिक सोहळा संपन्न झाला.
या वेळी मलकापूर आगाराची एसटी बस मलकापूर–नाशिक या मार्गावरून आई तुळजाभवानी व आई रेणुका माता यांच्या खण–नारळाच्या ओटीचा मान घेऊन मार्गस्थ झाली. पुढे या बसने वणी गडावरील सप्तशृंगी मातेला साकडे घातले.
या सोहळ्यात वाहक, चालक तसेच प्रवाश्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. आपली लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या एसटी बसचे महिलांनी पूजन केले. रेणुका माता बसथांबा लवकरच सुरू व्हावा, अशी प्रार्थना यावेळी भक्तांनी सप्तशृंगी मातेकडे केली.
या उपक्रमासाठी मलकापूर आगाराचे अधिकारी, कर्मचारी, वाहक व चालक यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी अभिनेता बाबासाहेब कोतुरकर, तसेच जावेद मुलानी यांचे सहकार्य मिळाले. सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व रेणुका भक्त उपस्थित होते.
भक्तांच्या अपेक्षेप्रमाणे रेणुका माता बसथांबा लवकरच सुरू होईल, अशी माहिती समारोपाला देण्यात आली.