प्रतिनिधी : मुंबई मंत्रालय येथे क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य युवा धोरण समितीची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समितीचे सदस्य ॲड. संग्राम शेवाळे यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत राज्यातील तरुणांच्या वाढत्या आत्महत्येचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करत चिंता व्यक्त केली.
यासाठी राज्यातील युवक व युवतींचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्वरित करावयाच्या उपाययोजना त्यांनी या बैठकीत सुचवल्या. यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन केंद्र, हेल्पलाईन क्रमांक आदी उपाययोजना अंमलात आणाव्यात असा प्रस्ताव त्यांनी सर्वांसमोर मांडला.
या बैठकीस आमदार सत्यजित तांबे, आमदार रोहीत पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार अमित गणपत गोरखे, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश पवार, आमदार आशुतोष काळे, आमदार प्रविण दटके, आमदार देवेंद्र कोठे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार प्रकाश सुर्वे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते.