कोपरखैरणे : माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा महासंघाचे संस्थापक कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त कोपरखैरणे विभागातील कै. आ. अण्णासाहेब पाटील उद्यानात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक शंकरराव मोरे, सायलीताई शिंदे, नारायण शिंदे, प्रभाग समिती सदस्य मारुती सकपाळ, समाजसेवक नितीन मामा हिंगे, अनिल चिकणे, रमेश सर संकपाळ तसेच विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.