मुंबई : तीन दशकांहून अधिक काळ सामाजिक, विधायक कार्यात अग्रेसर राहणारे आणि लेखणीव्दारे वृत्तपत्रांतून समाजातील व्यथा, वेदना, समस्या आजही सातत्याने मांडत रहाणारे जेष्ठ वृतपत्र लेखक, पत्रकार,साप्ताहिक भगवे वादळचे संपादक दत्ता श्रावण खंदारे यांना वसुधा फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने समाज माध्यम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वसुधा फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथे पहिली माध्यम परिषद, पत्रकार स्नेह मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी पत्रकार दत्ता खंदारे यांना जेष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते समाज माध्यम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आम्ही मुबंईकर साप्ताहिकाचे संपादक प्रमोद सूर्यवंशी,युवा क्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,वसुधा फाऊंडेशनच्या संस्थापिका वसुधा नाईक आदी मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
पत्रकार दत्ता खंदारे समाज माध्यम गौरव पुरस्काराने सन्मानित!
RELATED ARTICLES